सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात अनेक जण लिंबू पाणी पिऊन करतात. काही जण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, तर काही शरीर हायड्रेट राहावे म्हणून या पेयाला पसंती देतात. व्हिटॅमिन सीचा नैसर्गिक स्रोत असलेल्या लिंबाचा वापर भारतीय घरांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.
किडनीच्या आरोग्याशी काय संबंध?
लिंबू पाणी पिण्याचा परिणाम केवळ पचन किंवा वजनावरच होत नाही, तर त्याचा संबंध किडनीच्या आरोग्याशीही आहे. विशेषतः किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी लिंबू पाणी उपयुक्त ठरू शकते, असे काही तज्ज्ञ सांगतात. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे लिंबामध्ये असणारे सिट्रेट. हे घटक कॅल्शियम ऑक्सलेटचे खडे तयार होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी?
दुसरीकडे, काही लोकांसाठी लिंबू पाणी पिणे महागात पडू शकते. किडनीत खडे होण्याची किंवा पित्त वाढण्याची शक्यता असलेल्या लोकांनी लिंबू पाणी पिताना काळजी घ्यावी. त्यामुळे लिंबू पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ जाणून घेऊनच त्याचा वापर करावा.
Leave a Reply