बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

हर्सूल स्मशानभूमीत सुविधांचा अभाव; नागरिकांचे निवेदन

हर्सूल येथील चेतनानगरी स्मशानभूमी मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेला निवेदन दिले.

हर्सूल स्मशानभूमीत सुविधांचा अभाव; नागरिकांचे निवेदन

हर्सूल येथील चेतनानगरी स्मशानभूमी मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अपुरी शेड, पाण्याची व्यवस्था नसणे, पथदिव्यांचा अभाव आणि कोसळलेली सुरक्षा भिंत यांसह विविध समस्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी निवेदन दिले आहे.

स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी एकच लहान शेड असून त्यात लोखंडी पिंजऱ्यांची व्यवस्था नाही. एकाच वेळी दोन अंत्यविधी आल्यास अडचण निर्माण होते. नातेवाइकांसाठी बैठक व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात भिजत थांबावे लागते. पाण्याची सोय नसल्याने अंत्यविधीसाठीचे पाणी अर्धा किलोमीटर अंतरावरील समाजमंदिरातून आणावे लागते, असे रंगनाथ वाघुळे, भगवान वाघुळे, निवृत्ती वाघुळे, कैलास वाघुळे, दादाराव वाघुळे, सांडू वाघुळे, सुनील वाघुळे, अशोक वाघुळे, सारंग वाघुळे, श्यामलाल गायकवाड, शांतिलाल तुपे, सुरेश तुपे, बंटी पवार यांच्यासह स्थानिक नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

रात्री अंधार, परिसरात दुर्गंधी

पथदिवे नसल्याने रात्री अंत्यविधी करताना अडचणी येतात. स्मशानभूमीची २५ ते ३० फूट सुरक्षा भिंत कोसळली असून, लोखंडी ताराही तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरात कचरा टाकला जात असून, दुर्गंधीचा त्रास होत आहे.

या आहेत मागण्या

स्मशानभूमीत नवीन शेड, लोखंडी पिंजरे, बैठक व्यवस्था, बोअरवेल किंवा नळजोडणी आणि पथदिवे बसवावेत. सुरक्षा भिंतीची पुनर्बांधणी करून उंची वाढवावी. कायमस्वरूपी स्मशानजोगी नेमून त्यांच्या निवासासाठी व साहित्य ठेवण्यासाठी लॉकर रूम बांधावी. प्रवेशद्वारापासून शेडपर्यंत आणि मोकळ्या जागेत गट्टू बसवावेत, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance