जंतरमंतरवरील आंदोलनातून केंद्रातील सरकारला धक्के देणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने, अर्थात सीजेपीनं, सक्रिय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वाखालील या पक्षाने संघटना वाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आंदोलनाच्या टप्प्यातून पुढे जात आता पक्षबांधणीच्या दिशेने ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसत आहे.
संघटना विस्तारासाठी झोनल प्रभारी नेमले
संघटनेच्या विस्तारासाठी पक्षाने झोनल प्रभारी नेमले आहेत. इतकेच नव्हे तर देशातील दहा राज्यांमध्ये राज्य आणि प्रादेशिक समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पक्ष आपले जाळे राज्यागणिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
कुठल्या राज्यात किती सदस्य?
पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात १६, महाराष्ट्रात १५, झारखंडमध्ये १४, ईशान्य भारतात १४, बिहारमध्ये १३, पश्चिम बंगालमध्ये १२, हरियाणात ६, राजस्थानमध्ये ५, उत्तराखंडमध्ये ६ आणि जम्मू-काश्मीरमध्ये ४ सदस्य नेमण्यात आले आहेत. या विस्तारामुळे तरुणांच्या राजकारणात या नव्या पक्षाचा कितपत प्रभाव पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply