शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगर ३.० ची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी मोठा डाव टाकला आहे. मुंबईत झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला जबर धक्का बसला आहे.
वेट अँड वॉच ३.० चे पोस्टर व्हायरल
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेले एक पोस्टर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. या पोस्टरवर वेट अँड वॉच ३.० असा मजकूर होता. हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती.
शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
मात्र ऑपरेशन टायगर ३.० सुरू होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी गेम फिरवला. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Leave a Reply