मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक: धैर्यशील मोहिते पाटीलही बाहेर

सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत ट्वीस्ट! खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दोन्ही गटांतील अर्ज मागे घेतले; आता कुटुंबातून अर्जुनसिंह मोहिते पाटील रिंगणात आहेत.

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक: धैर्यशील मोहिते पाटीलही बाहेर

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीत सहा माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर या उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयानेही माजी संचालकांचे अपील फेटाळून लावले. अशातच आता शरद पवार गटाचे नेते आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचे समोर आले आहे.

माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा अर्ज आधीच बाद झाला होता. बाद ठरवलेल्या उमेदवारी अर्जावरील अपीलही उच्च न्यायालयाने फेटाळले. अशातच आता खासदार मोहिते पाटील यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांचे बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज अद्याप कायम आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस

जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी (१७ नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कृषी पणन प्रक्रिया संस्था आणि इतर शेती संस्था या दोन्ही गटांमधून अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांनी आता दोन्ही गटांतील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबातून आता अर्जुनसिंह मोहिते पाटील हे एकमेव उमेदवार म्हणून डीसीसी बँक निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. कुटुंबातील दिग्गज नेत्यांनी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.

सहा माजी संचालकांचे अर्ज बाद; उच्च न्यायालयाने अपील फेटाळले

या निवडणुकीत मातब्बर नेत्यांना मोठा धक्का बसला होता. अर्ज छाननीमध्ये माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह दिलीप माने, जयंतराव जगताप, संजयमामा शिंदे, सुरेश हसापुरे आणि बबनराव आवताडे अशा मातब्बर नेत्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते. अर्ज बाद झालेल्या या सर्व नेत्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र तिथेही सहा माजी संचालकांचे अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीतील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance