मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बावनकुळेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल: ‘आधी उंची ओळखा’

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. फडणवीसांवरील आरोपांवरून त्यांनी रोहित पवारांना प्रसिद्धीचा हव्यास असल्याचे म्हटले.

बावनकुळेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल: ‘आधी उंची ओळखा’

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, रोहित पवार यांना प्रसिद्धीचा हव्यास लागला आहे. आरोप करण्याआधी त्यांनी स्वतःची उंची ओळखली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

बावनकुळे म्हणाले की, ज्या कंपनीच्या विमानाने रोहित पवार कितीतरी वेळा फिरले आहेत, त्याचे फोटो सर्वांना दिसतील. त्या विमान कंपनीच्या विमानाने राज्यातील ९० टक्के नेत्यांनी प्रवास केला असेल, याचा अर्थ त्या नेत्यांचे त्या कंपनीशी संबंध आहेत, असा होत नाही. रोहित पवार अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण करत असून त्यांना प्रसिद्धीत येण्याचा चंग लागला आहे, असा आरोप त्यांनी केला.

अजित पवार यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून आरोप

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. हा कार्यक्रम रोहित पवार यांना आवडला नाही, त्यामुळे तो कार्यक्रम खाली दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक असे आरोप करण्यात आले, असा दावा बावनकुळे यांनी केला.

शरद पवार यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली आणि त्यांनी कधीही प्रसिद्धीचा असा हव्यास केला नाही, असे सांगत बावनकुळे म्हणाले की, रोहित पवार यांनी शरद पवार यांच्याकडून शिकले पाहिजे. फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. रोहित पवार हे फडणवीस यांच्याबद्दल अजित पवार यांच्या विषयावर बोलताना महाराष्ट्राची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सीमांकनावर सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे संबंध कसे होते, हे आपल्याला माहिती आहे, असे सांगत बावनकुळे म्हणाले की, दोघांनी एकमेकांना भावाप्रमाणे सांभाळले होते. रोहित पवार हे बालिश असून त्यांनी बालिशपणाच्या अत्यंत खालच्या स्तरावरचे राजकारण केले आहे. अशा राजकारणामुळे महाराष्ट्राची उंची कमी करण्याचे काम झाले, असा आरोपही त्यांनी केला.

सीमांकनाच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ लहान असले पाहिजेत, अशी भूमिका मांडली आहे. सध्या ३०० किलोमीटरचे लोकसभा आणि दीडशे किलोमीटरचे विधानसभा मतदारसंघ आहेत. ४०-४० लाख लोकसंख्येचे मतदारसंघ झाले आहेत, त्यामुळे सीमांकन आवश्यक आहे. विकसित भारताच्या संकल्पनेसाठी जेवढे लोकप्रतिनिधी जास्त असतील, तेवढा संकल्प पुढे जाईल, असे त्या म्हणाल्या होत्या. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो, त्यामुळे सीमांकनाला सुप्रिया सुळे मदत करत असतील तर त्यांचे अभिनंदन करेन, असे बावनकुळे म्हणाले.

रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, असे दिसत आहे. म्हणूनच ते असे वागत आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला. फडणवीस यांच्यावर आरोप करणे चुकीचे असून रोहित पवार यांना जाणीवपूर्वक शरद पवार गटातून बाहेर जायचे आहे, असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्या दुर्घटनेचा पूर्ण पर्दाफाश झाला पाहिजे, ही भाजपची आधीपासूनची भूमिका आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस खूप प्रयत्न करत आहेत. असे आरोप लावल्याने फडणवीस यांच्या प्रतिमेवर काही फरक पडत नाही, मात्र ज्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत, त्यांच्यावर असे आरोप लावणे सहन होत नाही. जनतेच्या मनातून रोहित पवार यांची प्रतिमा कमी झाली, हेच खरे नुकसान आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance