स्मार्टफोन हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. कॉल आणि संदेशांसह इतर अनेक कामांसाठी त्याचा वापर केला जातो. फोनमध्ये वैयक्तिक माहिती, बँक तपशील आणि इतर महत्त्वाचा डेटा साठवलेला असतो. अशा परिस्थितीत योग्य काळजी घेतली नाही, तर एका सामान्य चुकीमुळे स्मार्टफोनमधील डेटा लीक होऊ शकतो.
अनेक स्मार्टफोन वापरकर्त्यांकडून केली जाणारी सर्वांत सामान्य चूक म्हणजे घराबाहेर जाताना स्मार्टफोनचा वाय-फाय चालू ठेवणे. वाय-फाय चालू राहणे ही अगदी सामान्य गोष्ट वाटत असली तरी त्यामुळे अनेक धोके निर्माण होऊ शकतात.
सवयीमागचा धोका
घराबाहेर पडल्यावरही वाय-फाय चालू राहिल्यास फोन आसपासच्या नेटवर्कच्या संपर्कात येऊ शकतो. अशा वेळी फोनमधील वैयक्तिक माहिती धोक्यात येण्याची शक्यता असते. ही बाब किरकोळ वाटत असली तरी त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, कारण फोनमध्ये बँकेशी संबंधित तपशीलही साठवलेला असतो.
काय काळजी घ्यावी?
घराबाहेर पडताना स्मार्टफोनचा वाय-फाय बंद ठेवणे ही साधी सवय डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते. गरज असेल तेव्हाच वाय-फाय चालू करणे आणि काम झाल्यावर तो बंद करणे, ही सवय लावल्यास वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका कमी होऊ शकतो. फोनमधील महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ही छोटीशी काळजी उपयुक्त ठरू शकते.
Leave a Reply