मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मसूर डाळ: प्रोटीनचा उत्तम स्रोत, वजन-डायबिटीज नियंत्रणात

मसूर डाळीत प्रोटीन, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ती वजन कमी करण्यास, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

मसूर डाळ: प्रोटीनचा उत्तम स्रोत, वजन-डायबिटीज नियंत्रणात

तुम्ही शाकाहारी आहात आणि पुरेपूर प्रोटीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात, तर तुमच्यासाठी एक डाळ अत्यंत कामाला येऊ शकते. या डाळीतून चांगले प्रोटीन मिळते. म्हणजे ही डाळ प्रोटीनचा एक चांगला स्रोत मानली जाते. चिकन आणि मटणापेक्षाही ही डाळ आरोग्यदायी आणि प्रभावी मानली जाते. ही डाळ दुसरी तिसरी कोणती नसून मसूरची डाळ आहे. मसूरच्या डाळीला लाल मसूरही म्हटले जाते. मसूरच्या डाळीत लोह, प्रोटीन, तंतुमय पदार्थ, खनिजे आणि कर्बोदके यांसारखी पोषक तत्त्वे असतात. आरोग्यासाठी ही पोषक तत्त्वे अत्यंत महत्त्वाची असतात.

मसूरची डाळ अशी बनवा

मसूरची डाळ बनवताना सर्वात आधी ही डाळ चांगली धुवून काढा. त्यानंतर कुकरमध्ये पाण्यासोबत शिजवा. त्यात मीठ आणि आले टाका. चांगली शिजल्यावर पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे आणि तेजपत्ता टाका. त्याचा तडतड आवाज झाल्यावर त्यात कापलेला टोमॅटो टाका. त्यानंतर तेल वेगळे होईपर्यंत ते तळा. नंतर यात आवश्यक तेवढी हिरवी मिरची, गरम मसाला, धने पूड आणि लाल मिरची मिसळा. या मिश्रणात डाळ टाका आणि शिजवा. मंद आचेवर १० मिनिटे डाळ शिजवा. त्यानंतर वरून चिरलेली कोथिंबीर टाका. तुमची डाळ तयार आहे.

डाळ खाण्याचे फायदे

१. वजन नियंत्रण: मसूरच्या डाळीत तंतुमय पदार्थ आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. त्यात कॅलरी अत्यंत कमी असतात. त्यामुळे वजन कमी होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मसूरची डाळ आहारात समाविष्ट करा.

२. मधुमेह: मसूर डाळीत तंतुमय पदार्थांचे गुण असतात. त्याचा मधुमेह रुग्णांना फायदाच होतो. तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही मसूर डाळीचे सेवन करू शकता.

३. हाडे मजबूत: मसूरच्या डाळीत कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात.

४. त्वचा: मसूरच्या डाळीत प्रभावी अँटिऑक्सिडंट असतात. ते त्वचेच्या उतींना मुक्त मूलकांपासून वाचवतात. मसूर डाळ खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance