सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

आमदाराच्या लेकीच्या लग्नात ५० कोटींचा थाट

बिहारचे आमदार अनंत सिंह यांच्या कन्या शिवांगी यांच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २५ नोव्हेंबरला होणाऱ्या सोहळ्यासाठी ४०-५० कोटी रुपये खर्च होणार आहे.

आमदाराच्या लेकीच्या लग्नात ५० कोटींचा थाट

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची कन्या शिवांगी हिच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशातील हा सर्वात मोठा विवाह सोहळा असून बिहारमधील हा ऐतिहासिक विवाह सोहळा ठरणार आहे. या विवाह सोहळ्यावर ४० ते ५० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लग्नात काहीही कमी पडू नये म्हणून स्वतः अनंत सिंह जातीने लक्ष देत आहेत. २५ नोव्हेंबर रोजी नदवां येथे हे लग्न होणार आहे.

दहा एकर जमिनीवर मोठा मंडप टाकण्यात आला आहे. हा मंडप एसी आणि वॉटर प्रुफ आहे. पाहुण्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

मेन्यू हे मुख्य आकर्षण

या लग्नाचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे मेन्यू असणार आहे. या लग्न सोहळ्यात १५० देशी-विदेशी पदार्थांची रेलचेल असणार आहे. यात बिहारी व्यंजनांपासून ते विदेशी व्यंजनांचा समावेश आहे. हे पदार्थ बनवण्यासाठी एक-दोन नव्हे, तर १००० हून अधिक हलवाई आणि शेफ कामाला लागले आहेत. तब्बल चार लाख देशी-विदेशी पाहुण्यांसाठी हे पदार्थ बनवले जात आहेत.

लग्नात स्टार्टर्स, मेन कोर्स आणि रॉयल डेजर्ट दिले जाणार आहेत. मिठाई, गुलाब जामून, रसगुल्ले, काजू कतली आणि बिहारचा प्रसिद्ध सिलाव खाजा पाहुण्यांना दिला जाणार आहे. नालंदा जिल्ह्यातील सिलावचा ५२ लेअरवाला खाजा हा या लग्नातील खास पदार्थ असणार आहे.

बिहारी आणि विदेशी पदार्थांची रेलचेल

या लग्नात पारंपारिक बिहारी पदार्थांची रेलचेल असणार आहे. पाहुण्यांसाठी लिट्टी चोखा, मखान्याची खीर आणि देशी तूपाने बनलेल्या मिठाई असणार आहेत. याशिवाय देशी तूपातील मालपुआ, बालूशाही, शाही कोफ्ता, कश्मिरी पुलाव आणि बिर्याणी आदी पदार्थांची रेलचेलही असणार आहे.

देशी पदार्थांसोबतच कॉन्टिनेंटल, चायनीज आणि साऊथ इंडियन स्टॉलही लावले जाणार आहेत. वऱ्हाडींना जे आवडते ते खाता यावे म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि फ्लेव्हरच्या आईस्क्रीम तसेच कुल्फी असणार आहेत. यात विदेशी आईस्क्रीमचाही समावेश आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance