पुण्याहून गुवाहाटीकडे निघालेल्या एका प्रवासी विमानात उड्डाणानंतर लगेचच तांत्रिक बिघाड आढळून आला. विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाल्याचे लक्षात येताच विमानतळ प्रशासनाने तातडीने आणीबाणी जाहीर केली. या विमानात १९२ प्रवासी प्रवास करत होते.
टेकऑफनंतर बिघाड उघडकीस
विमानाने पुणे विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच लँडिंग गिअरमध्ये बिघाड असल्याचे समोर आले. त्यानंतर विमान सुमारे ३१ हजार फूट उंचीवर असताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमान पुणे विमानतळाकडे परतवण्यात आले. विमानतळावर आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती.
विमानतळावर आणीबाणी घोषित
घटनेची माहिती मिळताच पुणे विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली. विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आणि विमानाचे आपत्कालीन लँडिंग पुणे विमानतळावर करण्यात आले. या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण होते.
Leave a Reply