अवकाश इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे. स्पेसएक्सच्या स्टारशिप अवकाशयानाने अंतराळातून परत येऊन इतिहास रचला. या मोहिमेने अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
२२ तासांची मोहीम, पृथ्वीभोवती १४ प्रदक्षिणा
स्टारशिपने आपल्या २२ तासांच्या मोहिमेदरम्यान पृथ्वीभोवती १४ प्रदक्षिणा घातल्या. एवढ्या प्रदीर्घ काळानंतर अवकाशयान सुरक्षितपणे परत येणे ही मोठी कामगिरी मानली जात आहे. या मोहिमेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
बूस्टर पकडण्याचे प्रयत्न अयशस्वी
चॉपस्टिक्स भुजांच्या साहाय्याने बूस्टरला हवेतच पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र बूस्टरला सुरक्षितपणे पकडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. या मोहिमेतील यश आणि अपयश या दोन्ही बाबींवर अवकाश क्षेत्रात चर्चा सुरू आहे.
Leave a Reply