उत्तराखंडमध्ये एका राजकीय कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. पिथोरगड जिल्ह्यात भारत-नेपाळ सीमेवर आयोजित ऐतिहासिक जौलजीबी मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यात ही घटना घडली. धारचुलाचे काँग्रेस आमदार हरीश सिंह धामी यांनी स्टेजवर येऊन गोंधळ घातला आणि कार्यक्रमात व्यत्यय आणला.
स्टेजवर माईक आणि खुर्च्या फेकल्या
आमदार हरीश सिंह धामी यांनी स्टेजवरील माईक आणि खुर्च्या फेकून दिल्या. साऊंड सिस्टिम चालवणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यांचा रौद्रावतार पाहून उपस्थितांमध्ये घबराट पसरली. कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आमदाराने केलेल्या या गोंधळामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Leave a Reply