घरातील प्रत्येक वस्तूचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो, असे वास्तुशास्त्र सांगते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. आपल्या नकळत होणाऱ्या काही चुका घरात वास्तुदोष निर्माण करतात. त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आयुष्यात अनेक अडचणी येऊ लागतात, असे या शास्त्रात सांगितले आहे.
पैसा हातात न टिकणे, खर्चात अचानक मोठी वाढ होणे आणि कोणतेही कारण नसताना घरात सतत वादविवाद होणे, ही त्याचीच लक्षणे मानली जातात. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे वापरात नसलेले, फाटलेले किंवा लहान झालेले कपडे कपाटात तसेच साठवून ठेवले जातात. वास्तुशास्त्रानुसार ही सवय अशुभ मानली जाते आणि ती टाळावी, असे सांगितले जाते.
फाटलेले कपडे का ठेवू नयेत?
घरात कधीही जुने झालेले, वापरात नसलेले किंवा फाटलेले कपडे साठवून ठेवू नयेत, असे वास्तुशास्त्र सांगते. अशा कपड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मानले जाते. जे कपडे फाटलेले आहेत, ते कधीही साठवून ठेवू नयेत; त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असा सल्ला दिला जातो.
फाटलेले कपडे घरात शनी आणि राहू दोष निर्माण करतात आणि त्यामुळे आयुष्यात अडथळे येऊ शकतात, असेही वास्तुशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे कपाटाची वेळोवेळी साफसफाई करून नको असलेले कपडे वेगळे करणे हिताचे ठरते.
जुने कपडे ठेवायचेच असतील तर काय काळजी घ्यावी?
काही जुने कपडे आठवण म्हणून किंवा पुढे उपयोग होईल म्हणून ठेवायचे असतील, तर ते फाटलेले किंवा जीर्ण झालेले नसावेत, याची काळजी घ्यावी. असे कपडे नीट घड्या घालून कपाटात ठेवावेत. कपडे ठेवण्याची दिशा पश्चिम किंवा दक्षिण असावी, असे सांगितले जाते. घराच्या बेडखाली अशा पद्धतीने जुने कपडे कधीही साठवून ठेवू नयेत, असा सल्ला वास्तुशास्त्र देते.
ही माहिती उपलब्ध स्रोतांवर आधारित आहे. यातील गोष्टींच्या तथ्यांबद्दल कोणताही दावा केला जात नाही आणि अंधश्रद्धेला दुजोरा दिला जात नाही.
Leave a Reply