रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कलिंगड लागवड घटली; बियाण्यांची नफेखोरी थांबली

खानदेशात यंदा कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील रब्बीत नऊ हजार हेक्टर असलेली लागवड यंदा दीड हजार हेक्टरही होणार नाही; बियाण्यांची नफेखोरी थांबली.

कलिंगड लागवड घटली; बियाण्यांची नफेखोरी थांबली

खानदेशात आगाप कलिंगडाची लागवड सुरू झाली आहे. मागील वेळेस काही कंपन्यांच्या कलिंगड वाणांची कृत्रिम टंचाई होती, पण यंदा कमी पाऊस आणि प्रतिकूल वातावरण यामुळे लागवड घटली आहे. परिणामी बियाणे विक्रीतून नफेखोरी करणाऱ्यांना फावत नसल्याने बियाणे व रोपे मुबलक किंवा अपेक्षेपेक्षा अधिक उपलब्ध आहेत. उपलब्ध बियाणे-रोपांमुळे शेतकरी हव्या त्या वाणांची निवड करून लागवड करीत आहेत.

लागवड सध्या रावेर, यावल, चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा आदी भागात सुरू आहे. पण लागवडीत घट झाली आहे. कारण कलिंगडाचे उत्पादन मागील रब्बीत किंवा उन्हाळी हंगामात कमी आले. त्यात दरही अस्थिर आहेत. तसेच अनेक भागात जानेवारीत टंचाई तयार होणार असल्याने अनेकांनी लागवड टाळली आहे. मागील वेळेस रब्बीत कलिंगडाची लागवड खानदेशात वाढली होती. खरिपासह रब्बीत मोठी लागवड झाली होती. ही लागवड मागील रब्बीत नऊ हजार हेक्टर एवढी होती. यंदाची लागवड दीड हजार हेक्टर एवढीदेखील होणार नाही.

जामनेरात सर्वाधिक घट

कलिंगडासाठी खानदेशात जामनेर तालुका अग्रेसर आहे. जामनेरातील लागवड दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मिळून दोन ते अडीच हजार हेक्टरपर्यंत असते. परंतु यंदा जामनेरातील लागवड घटली आहे. चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा हा भागही कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे. परंतु अनेक शेतकरी दर अस्थिर असल्याने सावध भूमिका घेत आहेत. बियाणे व किडनाशके, विद्राव्य खते पुरवठादार आणि एजंट चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे प्रकारही मागील कालावधीत घडले आहेत.

जानेवारीत काढणीचे नियोजन

खानदेशातील कलिंगड लागवड कमी राहणार आहे. काही शेतकऱ्यांनी जानेवारीतच काढणी होईल, या दृष्टीने नियोजन केले आहे. लागवड कृत्रिम जलसाठे मुबलक असलेल्या तापी आणि गिरणा पट्ट्यात झाली आहे. अन्य भागात मात्र लागवड अनेकांनी टाळली आहे. आतापर्यंत खानदेशात मिळून ५०० हेक्टरवर कलिंगड लागवड झाल्याचा अंदाज आहे. ही लागवड पुढील महिन्यातही काही शेतकरी करतील. लागवड आता पुढील एप्रिलपर्यंत सुरू राहील. परंतु यंदा बियाणे पुरवठादार आणि रोपे उत्पादकांची मनमानी व नफेखोरी बंद झाल्याचे दिसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance