शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

युनियन बँकेचे विकसित भारतासाठी योगदान; वर्धापन दिन साजरा

१०८ वर्षांपूर्वी गांधींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या युनियन बँकेच्या देशात ८ हजार ७०० शाखा आहेत; तिचे योगदान लक्षणीय असल्याचे बागुल यांनी मालेगावात सांगितले.

युनियन बँकेचे विकसित भारतासाठी योगदान; वर्धापन दिन साजरा

मालेगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हस्ते १०८ वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या युनियन बँक ऑफ इंडियाची ऐतिहासिक प्रगती झाली आहे. देशात बँकेच्या ८ हजार ७०० शाखांचा विस्तार आहे आणि देशाच्या विकासातील बँकेचे योगदान लक्षणीय ठरले आहे. देशात सर्वात आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान, ग्राहकाभिमुख सेवा आणि व्यवस्थापनातील कौशल्य यामुळेच ही बँक जनादराचा विषय ठरली असल्याचे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य भगवान बागुल यांनी येथे केले. येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे व्यवस्थापक नितीन महेशकर होते.

शंभर टक्के कोअर बँकिंग सोल्युशन

बागुल म्हणाले की, देशातील सर्व शाखांमध्ये शंभर टक्के कोअर बँकिंग सोल्युशन असलेली ही देशातील पहिली बँक ठरली आहे. मालेगाव शाखेत सर्वच स्तरातील ग्राहकांना चांगली आणि तत्पर सेवा मिळत आहे. सौजन्यपूर्ण वागणूक आणि आपुलकीची भावना ग्राहकांना मिळत असल्याने शहरात बँक अग्रणी ठरली आहे. बँक व्यवस्थापक महेशकर यांनी शाखेची प्रगतीकडील वाटचाल स्पष्ट केली, तर दीपाली देवकर यांनी प्रास्ताविक केले.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance