गोकुळच्या निवडणुकीतील नाट्यमय घडामोडी आणि विजय मिळवूनही खुर्ची गमावल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. राज्यात तीव्र दुष्काळाच्या झळा बसत असून शेतकरी संकटात सापडला आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
उर्वरित तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करा
राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा तात्काळ समावेश करावा आणि शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन न देता सरसकट पीक कर्जमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. याच प्रश्नावरून गडहिंग्लजमध्ये सर्वपक्षीयांचा भव्य मोर्चा काढण्यात आला आणि दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील यांनी कर्जाचे पुनर्गठन नको, सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली.
निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार
राज्य शासनाने यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून आपण स्वतः शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. गडहिंग्लज येथे दुष्काळग्रस्त संघर्ष समितीने पुकारलेल्या सर्वपक्षीय मोर्चा आणि आंदोलनात सहभाग घेत त्यांनी हा इशारा दिला.
गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत तात्काळ समावेश करावा, या मागणीसाठी गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे. गुरुवारी दुष्काळग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील दसरा चौकात हा मोर्चा आल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. आमदार सतेज पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, या विराट मोर्चामध्ये तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत या मोर्चामध्ये सहभाग घेतला तसेच भोजनही केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply