छत्रपती संभाजीनगरमधील बीडकीन ऑरिक औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर १३ मध्ये दोन उद्योगांना वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडने (एमआयटीएल) विद्युत कामांच्या स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. विराज इंडस्ट्रीज आणि आदित्य रुद्र इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांच्या भूखंडांवर वीज वितरणासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या दोन्ही कामांचा एकत्रित अंदाजित खर्च १२ लाख १७ हजार रुपयांवर आहे.
दोन्ही उद्योगांसाठी काय काम होणार
विराज इंडस्ट्रीजच्या प्लॉट क्रमांक ६५ साठी रिंग मेन युनिट (आरएमयू), कॉम्पॅक्ट सबस्टेशन (सीएसएस) आणि एलटी फीडर पिलरची उभारणी, तसेच उच्चदाब वीजवाहक केबलची जोडणी करण्यात येणार आहे. या कामासाठी ७ लाख ६१ हजार ७१२ रुपयांचा अंदाजित खर्च निश्चित केला आहे. ६३० अँपिअर क्षमतेचे, चार-वे आरएमयू बसविण्यात येणार असून, त्यामध्ये दोन लोड ब्रेक स्विच आणि दोन व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर असतील. हे आरएमयू स्काडा प्रणालीशी सुसंगत असेल. तर आदित्य रुद्र इंडस्ट्रीजच्या प्लॉट क्रमांक १९ साठी एलटी फीडर पिलर आणि ११०० व्होल्ट क्षमतेची ३०० चौरस मिलिमीटरची ॲल्युमिनियम आर्मर्ड केबल टाकण्यात येणार आहे. याशिवाय ३१५ ते ३२० अँपिअर क्षमतेचा मिनी फीडर पिलर, अर्थिंग आणि काँक्रिटचा पाया तयार केला जाणार आहे. या कामासाठी ४ लाख ५५ हजार ४४१ रुपयांचा अंदाजित खर्च आहे.
निविदा आणि मुदत
एमआयटीएलने १२ नोव्हेंबर रोजी या दोन्ही कामांसाठी स्वतंत्र निविदा काढल्या आहेत. पात्र विद्युत कंत्राटदारांना २० नोव्हेंबर रोजी दुपारी तीनपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. कार्यादेश मिळाल्यानंतर १५ दिवसांत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply