भोर तालुक्यातील सुप्रसिद्ध सुवासिक इंद्रायणी भात वाणाला आता बाजारपेठ मिळणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या वाणाचे ब्रँडिंग करून तांदळाला बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (ता. १०) लोकनेते अनंतराव थोपटे मुख्य बाजार आवारात दिली. सोयाबीनपासून कच्चे तेल तयार करणे आणि बांबू प्रकल्पाची उभारणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१, २ आणि ५ किलोचे पॅकिंग
भोर येथे २७ व्यापारी गाळ्यांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी थोपटे बोलत होते. धरणातील आवर्तने सोडताना भोरला प्राधान्य दिले पाहिजे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दुष्काळामुळे भाताचे उत्पन्न अडचणीत असताना बाजार समितीच्या माध्यमातून इंद्रायणी भाताची खरेदी करून त्याचा तांदूळ तयार केला जाणार आहे. त्यानंतर १, २ आणि ५ किलोचे पॅकिंग केले जाईल. यामुळे बाजार समितीच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या प्रतीचा तांदूळ खरेदी करता येईल.
सोयाबीन तेल आणि बांबू प्रकल्प
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे, पंचायत समिती सदस्या सुषमा चव्हाण, सभापती सुरेश राजिवडे, उपसभापती प्रवीण शिंदे, बाळासाहेब गरुड, रोहन बाठे, आनंदराव आंबवले, अॅड. जयश्री शिंदे, अमर बुदगुडे, अनिल सावले, विक्रम चव्हाण, रवींद्र कंक, संतोष धावले आदी उपस्थित होते. राजेंद्र शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर महेश धाडवे यांनी आभार मानले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply