हिंदू संस्कृतीत कमळाला विशेष महत्त्व आहे. आता महिलांच्या साडी डिझाईन्समध्येही कमळ डिझाईन मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहे. पारंपारिक साड्यांपासून ते अगदी मॉडर्न डिझायनर ड्रेप्सपर्यंत कमळ डिझाईन सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
पारंपारिक लूकसोबत युनिक आणि क्लासी पॅटर्न्स
पारंपारिक लूकसोबतच काहीतरी युनिक आणि क्लासी ट्राय करायचे असेल, तर कमळाच्या डिझाईन्सचे हे पाच लेटेस्ट पॅटर्न्स नक्की ट्राय करा. हाताने रंगवलेल्या आणि भरतकाम केलेल्या कमळ डिझाईनच्या साड्या खास प्रसंगांसाठी उत्तम पर्याय ठरतात.
ऑर्गनझा कमळ प्रिंट साड्या
कमळ प्रिंट असलेल्या साड्यांमध्ये आजकाल हलक्या वजनाच्या ऑर्गनझा साड्यांची खूप फॅशन आहे. या फॅब्रिकवर मोठ्या आकाराचे किंवा पेस्टल रंगांमधील कमळ प्रिंट उठून दिसतात. हलक्या आणि आरामदायी असल्याने या साड्या दिवसभराच्या कार्यक्रमांसाठीही सोयीच्या ठरतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply