भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय संघाच्या रचनेत मोठा बदल होणार आहे. शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाचे चित्र पूर्णपणे बदललेले असेल. कर्णधारापासून ते अनेक महत्त्वाच्या खेळाडूंपर्यंत फेरबदल करण्यात आले आहेत.
गिल आणि राहुल बाहेर, अय्यरच्या हाती धुरा
सध्या सुरू असलेल्या मालिकेतून कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी यष्टीरक्षक केएल राहुल शेवटच्या दोन सामन्यांतून बाहेर पडणार आहेत. त्यांच्या जागी श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व सांभाळणार असून, ईशान किशन उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणार आहे. नव्या कर्णधार-उपकर्णधार जोडीसह भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
तिसरा सामना पावसामुळे रद्द
मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांचे महत्त्व आणखी वाढले आहे. नव्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाकडून चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply