दिवाळीमध्ये सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहे. आज दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली, तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. सोन्याचे दर घसरल्यामुळे आज खरेदीची सुवर्णसंधी आहे. आज दिवाळी पाडवा असल्यामुळे नवरा-बायको एकमेकांना सोन्याचे गिफ्ट भेट देऊ शकतात.
२४ कॅरेट सोन्याचे दर
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४९० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४४,११० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,९०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १४,४१,१०० रुपये खर्च करावे लागतील.
२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३२,१०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ४,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,२१,००० रुपये मोजावे लागतील.
२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ३७० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०८,०८० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचा दर आज १०,८०,८०० रुपये आहे.
चांदीचे दर स्थिर
दरम्यान, आज सोनं स्वस्त झालं पण चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदी २०५ रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदी २,०५,००० रुपयांना खरेदी करावी लागेल. सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी दर किती आहेत ते वाचून जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply