दीपावली हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. हा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यावल तालुक्यातील बोरमळी येथे आदिवासी बांधवांसोबत सहपरिवार, सहकुटुंब दीपावली साजरी केली.
फराळ वाटप आणि स्नेहभोजन
या वेळी आदिवासी पाड्यावरील बंधू-भगिनींना मंत्री महाजन यांच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. त्यांनी सर्वांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी बांधवांच्या भेटीला गेलेल्या महाजन यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.
फराळ वाटपाच्या माध्यमातून केवळ सणाचा आनंदच नव्हे, तर आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा भावही त्यांनी जपला. या वेळी उपस्थितांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेमळ संवादामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
उपस्थित मान्यवर
माणुसकीचे नाते जपत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सण साजरा करण्याचा त्यांचा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आनंददायी ठरला. आदिवासी बांधवांसोबतच्या या स्नेहपूर्ण सहवासामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा व समाधानाचा भाव दिसून आला. या वेळी आमदार अमोल जावळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच आदिवासी बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply