धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका घराला आग लागली. गोविंद करंडे यांच्या घराला लागलेल्या या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये करंडे यांचे आई-वडील, दोन मुली आणि पती-पत्नीचा समावेश आहे.
आमदार घटनास्थळी; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
घटनेची माहिती मिळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पहाटे ४.२० वाजता घटनास्थळी धाव घेतली. तातडीने कळंब आणि तुळजापूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेबाबत अधिक माहिती येत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply