मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर. या जोडप्याने दिवाळीच्या खास मुहूर्तावर मुंबईतील आपल्या नव्या घराचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या नव्या घराची झलक पाहून चाहतेही भारावून गेले आहेत.
२०१७ ते २०२६ असा घरांचा प्रवास
सिद्धार्थ आणि मितालीने लग्नानंतर वर्षभरातच मुंबईत स्वतःचे पहिले घर खरेदी केले होते. २०२२ मध्ये त्यांनी त्या नव्या घरात प्रवेश केला होता. आता या जोडप्याने मुंबईतच दुसरे हक्काचे घर घेतले आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी या नव्या घराची खरेदी केली होती, मात्र त्याची सुंदर झलक त्यांनी दिवाळीनिमित्ताने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
विशेष म्हणजे, सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने २०१७ ते २०२६ या प्रवासातील तीन घरांचे फोटो शेअर केले होते. २०१७ ते २०१९, २०१९ ते २०२२ आणि २०२२ ते २०२६ असा त्यांच्या घरांचा प्रवास या फोटोंमधून पाहायला मिळाला. प्रत्येक घराने त्यांना आयुष्यात काहीतरी नवे शिकवले, अशी भावना त्याने व्यक्त केली होती.
घराची झलक आणि कलाकारांच्या शुभेच्छा
मितालीने शेअर केलेल्या नव्या घराच्या फोटोंमध्ये हॉल, किचन, बेडरूम, डायनिंग एरिया आणि बाथरूमची सुंदर झलक पाहायला मिळते. घराची आकर्षक रंगसंगती, आधुनिक फर्निचर, इंटिरिअर आणि जागोजागी ठेवलेली इनडोअर प्लांट्स यामुळे घराला एक प्रसन्न आणि आल्हाददायक लूक मिळाला आहे. या फोटोंमध्ये सिद्धार्थ, मिताली आणि त्यांच्या लाडक्या श्वानाचीही झलक पाहायला मिळते. या फोटोंना मितालीने ‘हेच गोकुळ अन् हीच माझी पंढरी’ असे कॅप्शन दिले आहे.
या पोस्टवर मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवानी सुर्वे, तितिक्षा तावडे, स्पृहा जोशी, प्रियदर्शिनी इंदलकर आणि नेहा पेंडसे यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या नव्या घराचे कौतुक केले आहे. अभिनेता अमेय वाघनेही या पोस्टवर खास मजेशीर कमेंट केली. घरातील प्रशस्त बाथरूम पाहून त्याने, “या बाथरूममध्ये अंघोळीला कधी येऊ?” अशी मिश्किल विचारणा केली. त्यावर सिद्धार्थनेही “मी कॉफी करतो, तू अंघोळ करून घे” असे मजेशीर उत्तर दिले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply