दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या रात्री मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुंबई आणि ठाण्यातील अनेक ठिकाणी यामुळे आगीच्या घटना घडल्या. ठाण्यातील विविध भागांत आग लागल्याच्या घटना समोर आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची एकच धावाधाव झाली. या घटनांची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
आगीच्या घटनांनंतर प्रशासन अलर्ट
ठाणे जिल्ह्यात आगीच्या घटना वाढत असल्याचे लक्षात येताच प्रशासन अलर्ट झाले. जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेत हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. रॉकेटसारख्या हवेत उडणाऱ्या फटाक्यांमुळे आग लागण्याचा धोका अधिक असतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
बंदीचा आदेश कधीपर्यंत लागू?
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला हा बंदीचा आदेश ८ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात हवेत उडणारे फटाके फोडण्यास मनाई असेल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply