सध्या पक्ष रस्त्यावर उतरून आक्रमकपणे लढा देत आहे. निवडणूक आयोग, त्याचे प्रमुख ज्ञानेश कुमार, एफिन्स्टन फाईल आणि ई-२० पेट्रोल यांसारख्या मुद्द्यांवर पक्षाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विरोधकाची भूमिका खऱ्या अर्थाने निभावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पक्षाच्या आर्थिक स्थितीबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
एका वर्षात देणगीत ७५ टक्क्यांची घसरण
निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात पक्षाला एकूण ५१७.४ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. मात्र २०२५-२६ या आर्थिक वर्षात ही रक्कम केवळ १३०.७ कोटी रुपयांपर्यंत घसरली. म्हणजेच देणगीत सुमारे ७५ टक्क्यांची घसरण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळाच्या तुलनेत पक्षाचा निधी आणि त्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आटले आहेत. पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रुडेंट ट्रस्टचे सर्वाधिक योगदान
पक्षाने याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. गेल्या काही वर्षांत प्रुडेंट इलेक्ट्रोल ट्रस्टने पक्षाला सर्वाधिक देणगी दिल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. २०२४-२५ या वर्षात या ट्रस्टचे योगदान एकूण देणगीच्या ४१.८ टक्के इतके होते. आता देणगीचा ओघ कमी झाल्याने पक्षासमोर आगामी काळात आर्थिक नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply