काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात आपल्या राजकीय प्रवासाबाबत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. राजकारणाच्या जगाविषयी त्यांना असलेली नापसंती त्यांनी या पुस्तकात मांडली आहे.
राजकारणातील महत्त्वाकांक्षा, लोभ, ढोंगीपणा आणि सत्तेच्या खेळासोबत येणारी विश्वासघाताची वृत्ती याबद्दल त्यांना तिटकारा होता, असे त्यांनी लिहिले आहे.
मुलांचा विरोध
मी राजकारणात येऊ नये, असे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे मत होते. या विषयावर दोघांनीही त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांना आपल्या आईला गमवायचे नव्हते, म्हणून त्यांनी विरोध केला होता, असा खुलासा सोनिया गांधी यांनी केला आहे.
त्याचबरोबर पंतप्रधानपद नाकारण्यामागचे कारणही त्यांनी या आत्मचरित्रात सांगितले आहे. या पुस्तकामुळे त्यांच्या राजकीय जीवनातील अनेक निर्णयांवर नवा प्रकाश पडला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply