रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

विलीनीकरणावरून अंकुश काकडेंचा पटेल-तटकरेंवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील विलीनीकरणाच्या चर्चांवरून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भूमिकेत यूटर्न घेतल्याचा आरोप अंकुश काकडे यांनी केला.

विलीनीकरणावरून अंकुश काकडेंचा पटेल-तटकरेंवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमधील विलीनीकरणाच्या चर्चा आता पुन्हा रंगल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची तयारी केली होती. पण अजित पवारांच्या अकाली निधनामुळे हे विलीनीकरण होऊ शकलं नाही. त्यानंतर या मुद्द्यावरून मोठं राजकारण झालं. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आणि पक्षाच्या अध्यक्षही झाल्या.

तटकरे- पटेल यांनी यूटर्न घेतल्याचा आरोप

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी विलीनीकरणाच्या चर्चांना अर्थ नसल्याचं यापूर्वी म्हटलं होतं. पण आता मात्र त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून यूटर्न घेतल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल विलीनीकरणासंदर्भात अशा प्रकारची चर्चा झाली नाही, असं सांगत होते आणि आमच्या नेत्यांना खोटं पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप काकडे यांनी केला. हे त्यांच्या फायद्यासाठी करत आहेत, असंही ते म्हणाले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दोघांनी ९० अंशाचा यूटर्न घेतलाय. आता ते म्हणतायेत की, अशी चर्चा झाली होती. आता ते म्हणतायेत की, विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळेस आम्ही बोलत होतो ते काय खोटं बोलत होतो का, असा सवाल काकडे यांनी उपस्थित केला.

अजितदादा हयात असताना प्रयत्न केल्याचा दावा

अजितदादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण व्हावं यासाठी मी प्रयत्न केले, असा दावा काकडे यांनी केला. याला साक्षीदार शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार आहेत, असं त्यांनी सांगितलं. अनेक वेळेस दादांबरोबर प्रवासात त्यांची चर्चा झाली. दादांचं काय मत आहे, हे मी साहेबांच्या कानावर घातलं, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विलीनीकरणाची चर्चा कुठेही नाही, असं काकडे म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांनी पवार साहेबांची भेट झाल्यानंतर स्वतःहून सांगितलं की, त्यांच्याशी विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्यावेळेस सांगत होते की, कोणतीही विलीनीकरणाची चर्चा झाली नाही. त्यावेळेस दोन-चार नेत्यांनी विलीनीकरणासाठी नाहीचा पाढा लावला होता. त्यावेळेस विलीनीकरणाच्या चर्चेसाठी आमच्या पक्षातून चार ते पाच नेते असायचे. दादा एकटेच खंबीर असल्यामुळे त्यांच्या पक्षाकडून ते एकटेच असायचे, असं म्हणत काकडे यांनी त्यांची भूमिका मांडली.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance