पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी किवी फलंदाजीची चांगलीच वाट लावली. सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवला जात आहे. कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी तो निर्णय योग्य ठरवला. न्यूझीलंडचा संघ केवळ १३४ धावांत गारद झाला. त्यामुळे विजयासाठी भारताला १३५ धावांची गरज आहे.
किवी फलंदाजी पुन्हा ढेपाळली
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात विल यंग आणि टिम सायफर्ट यांनी केली. सायफर्ट खाते न उघडताच बाद झाला, तर यंग केवळ ६ धावा करून परतला. हेन्री निकोल्सने ११ धावांची खेळी केली. टॉम लॅथमने केवळ ७ धावांचे योगदान दिले. फॉर्मात असलेला ग्लेन फिलिप्सही शून्यावर बाद झाला. एका टप्प्यावर न्यूझीलंडचा अर्धा संघ ५० धावांच्या आतच बाद झाला होता.
डॅरिल मिचेल आणि मिशेल सँटनर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मिचेलने ५५ धावांची खेळी केली. काईल जेमिसन ७ धावा करून बाद झाला. मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
ब्रार-नबीची भेदक गोलंदाजी
गुरनूर ब्रारने कमाल गोलंदाजी केली. त्याने निर्धाव षटक टाकत महत्त्वाच्या दोन बळींसह एकूण तीन फलंदाज बाद केले. औकिब नबीने अचूक मारा करत दोन महत्त्वाचे बळी पटकावले. अंशुल कंबोजनेही एक बळी घेतला. ५० धावांच्या आत भारताने न्यूझीलंडचे पाच फलंदाज बाद केले होते.
हा सामना जिंकून भारत मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे, तर न्यूझीलंड पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply