रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

गवळवाडी पर्यायी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी होणार

नाशिक रिंगरोडसाठी गवळवाडी पर्यायी मार्गाची पाहणी होणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महामंडळाला पाहणीचे आदेश दिले आहेत. अहवाल सरकारला सादर होणार आहे.

गवळवाडी पर्यायी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी होणार

नाशिकमधील बहुचर्चित परिक्रमा मार्ग (बाह्य रिंगरोड) प्रकल्पात मखमलाबाद-गोवर्धन-विंचूर गवळी अलाइनमेंटला पर्याय म्हणून गवळवाडी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या पाहणीबाबत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला आदेश दिले आहेत. पाहणीनंतरचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार असल्याचा दावा बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांचा विरोध कशाला

रिंगरोड प्रकल्पात मखमलाबाद ते गोवर्धन आणि विंचूर गवळी या परिसरातील शेतकऱ्यांचा प्रस्तावित अलाइनमेंटला सातत्याने विरोध आहे. शेतकऱ्यांची घरे, विहिरी, बोअरवेल आणि सुपीक जमिनींचे नुकसान टाळण्यासाठी गवळवाडीचा पर्यायी मार्ग व्यवहार्य असल्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे. या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची वारंवार भेट घेऊन चर्चा केली होती. या मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना गवळवाडी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध पर्यायांचा तांत्रिक अभ्यास करण्याच्या आणि त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चर्चेप्रसंगी दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, पंकज खताळे, भारत पिंगळे आणि रिंगरोड बाधित शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

वाढीव मोबदल्याची मागणी

अंतिम निवाडे जाहीर झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांना २५ टक्के वाढीव मोबदला मिळावा, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केली आहे. सर्व गावांतील सर्वोच्च खरेदीखतांचे दर विचारात घेऊन जिरायत, हंगामी बागायत आणि बागायत जमिनींचे नव्याने सर्वेक्षण करावे आणि त्या फेरसर्वेक्षणाच्या आधारे सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय्य व वाढीव मोबदल्यासाठी पुरवणी निवाडा जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance