जळगाव येथे कवी आणि लेखक प्रा. गोपीचंद धनगर यांच्या ‘दिवटी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. शहरातील काव्यरत्नावली चौकात साहित्य, सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी हा प्रकाशन सोहळा पार पडला.
५८ साहित्यिकांचे लेखन एकाच अंकात
या अंकात कविता, कथा, विशेष लेख, ललित लेख आणि कादंबरी या प्रकारांतील महाराष्ट्रातील ५८ नामवंत साहित्यिकांच्या साहित्याचा समावेश आहे. प्रकाशनप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आणि चित्रकार राजू बाविस्कर, सुप्रसिद्ध साहित्यिक कवी अशोक कोतवाल, कवी जितेंद्र कुवर, अथर्व पब्लिकेशन्सच्या संगीता माळी, विजय जैन, समीक्षक डॉ. रमेश माने, कवी-कथाकार जगदीश पाटील, उर्दू भाषेतील साहित्यिक मोइनुद्दीन उस्मानी, प्रभात चौधरी, ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, डॉ. साहेबराव भुकन, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, सिने-नाट्य कलावंत हर्षल पाटील, प्रा. युनूस शेख, डॉ. मिलिंद बागुल, बाबुराव पानपाटील, सुनील सोनवणे आणि वसंत गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
खानदेशच्या वैभवात भर
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ‘दिवटी’ अंकाचे स्वागत केले. या अंकामुळे खानदेशच्या वाड्मयीन आणि सांस्कृतिक वैभवात भर पडल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सत्यजित साळवे यांनी केले, तर प्रा. धनगर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. नीलेश चौधरी, डॉ. ज्ञानोबा सोनटक्के आणि डॉ. शांताराम तायडे यांनी परिश्रम घेतले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply