आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कूटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील तितक्याच उपयोगी ठरतात. चाणक्य म्हणतात, जगात अशा काही गोष्टी असतात, ज्यांच्यापासून माणसाने कोसो दूर राहिले पाहिजे. या गोष्टींपासून दूर राहण्यातच आपले हित आहे. या गोष्टींचा माणसाला चटकन मोह होतो. क्षणिक फायदा वाटत असला तरी त्याचे दूरगामी परिणाम महाभयंकर असतात. माणूस या गोष्टींमध्ये गुंतत जातो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. अशा गोष्टींमुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे कोणतीही गोष्ट विचारपूर्वकच केली पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
अति खर्च टाळा
चाणक्य म्हणतात, माणसाने नेहमी खर्चाचा ताळेबंद ठेवला पाहिजे. उत्पन्नाच्या फक्त ७५ टक्के रक्कमच खर्च केली पाहिजे. समजा, उत्पन्न शंभर रुपये असेल तर त्यातले ७५ रुपयेच खर्च केले पाहिजेत आणि २५ टक्के रकमेची बचत केली पाहिजे. परंतु अनेकांना अशी सवय असते की ते उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात. त्यामुळे असे लोक अडचणीत येतात. म्हणून अति खर्चाचा मोह टाळला पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
विनाकारण कर्ज घेऊ नका
चाणक्य म्हणतात, अनेक लोक काहीही गरज नसताना उगाचच कर्ज घेतात. माणूस एकदा कर्जाच्या दुष्ट चक्रात गुंतत गेला तर तो आयुष्यभरासाठी त्यातून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे माणसाने कर्ज कधीही घेतले नाही पाहिजे. अगदीच गरज असेल तरच कर्ज घ्यावे. तसेच आपण ते कर्ज फेडू शकतो का, याचाही विचार करावा. आपण जेवढे कर्ज फेडू शकतो तेवढेच कर्ज घ्यावे, अन्यथा अडचणीत सापडू शकतो.
कोणाशीही शत्रूत्व करू नका
चाणक्य म्हणतात, आयुष्यात चुकूनही कोणाशी शत्रूत्व करू नये. जेवढे शत्रू कमी तेवढे जास्त यश मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाला मित्र बनवले पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. या तीन गोष्टींपासून दूर राहिल्यास आयुष्यातील अनेक अडचणी टाळता येतात, हाच चाणक्य नीतीचा मुख्य संदेश आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply