दिवाळीची सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशी आहे. त्यामुळे बँक सुरू राहणार की बंद असणार, असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार आज बँका सुरू राहणार आहेत. मात्र उद्या, शनिवारी बँका बंद राहतील. त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतील तर नोव्हेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी आधी तपासून घेणे गरजेचे आहे.
नोव्हेंबरमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद?
नोव्हेंबरमध्ये विविध सण, स्थानिक उत्सव आणि विशेष दिवसांमुळे काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. ९ नोव्हेंबरला त्रिपुरा, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बँका बंद राहतील. १० नोव्हेंबरला गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये सुट्टी असेल. ११ नोव्हेंबरला सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
१३ नोव्हेंबरला मेघालय, १६ नोव्हेंबरला बिहार आणि झारखंड, २० नोव्हेंबरला उत्तराखंड, २३ नोव्हेंबरला मेघालयमध्ये बँका बंद राहतील. २४ नोव्हेंबरला मिजोरम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, तेलंगणा, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, नागालँड, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टी असेल. २७ नोव्हेंबरला कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील.
रविवार आणि शनिवारच्या सुट्ट्या
नोव्हेंबरमध्ये ८, १५, २२ आणि २९ तारखेला रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. तसेच १४ नोव्हेंबर हा दुसरा शनिवार आणि २८ नोव्हेंबर हा चौथा शनिवार असल्यामुळे या दिवशीही बँकांचे कामकाज होणार नाही.
बँकेला सुट्टी असली तरी ग्राहकांना यूपीआय, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करता येतील. एटीएममधून पैसे काढण्याची सुविधाही सुरू राहील. मात्र चेक जमा करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे किंवा इतर शाखेशी संबंधित कामांसाठी बँकेत जाण्यापूर्वी आपल्या राज्यातील सुट्टीची माहिती नक्की तपासा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply