दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगाराने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. ४ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह गुजरातमधील विविध शहरांसाठी या अतिरिक्त बसेस धावणार आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सुरत, बडोदा आणि अहमदाबाद या मार्गांचा त्यात समावेश आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी दिली.
कोणत्या मार्गांवर जादा बसेस धावणार
धुळे विभागाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे आणि विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांच्या मार्गदर्शनाखाली बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शिरपूर आगारातून पुणे, नाशिक, अलिबाग, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव, चोपडा, शहादा, धुळे, सुरत, अंकलेश्वर, बडोदा आणि अहमदाबाद या मार्गांवर जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वातानुकूलित आणि परिसर बससेवाही
शिरपूर आगारातून ऑक्टोबर महिन्यापासून ई-व्ही वातानुकूलित बस सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय शिरपूर ते बोराडी, मालकातर आणि पानसेमल, तसेच शिरपूर ते आढे, थाळनेर, मांजरोद आणि होळनांथा या मार्गांवर परिसर बससेवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील आणि स्थानक प्रमुख मनोज पाटील यांनी दिली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply