मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दिवाळीच्या खरेदीत साड्या आणि डिझायनर ब्लाऊजची क्रेझ

दिवाळी जवळ आल्याने हिंगोलीच्या बाजारपेठा सजल्या आहेत. पैठणीपासून डिझायनर साड्यांपर्यंत विविध पर्यायांना महिलांची पसंती मिळत असून डिझायनर ब्लाऊजचीही मागणी आहे.

दिवाळीच्या खरेदीत साड्या आणि डिझायनर ब्लाऊजची क्रेझ

दिवाळी सण जवळ आल्याने सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठेत दिवाळीत लागणाऱ्या विविध वस्तू उपलब्ध झाल्या असून, या वस्तूंची खरेदी वाढली आहे. विशेषतः सणासुदीला नवा पेहराव करण्यासाठी महिलांची पारंपरिक पैठणीपासून डिझायनर साड्यांपर्यंत विविध पर्यायांना पसंती मिळत आहे.

बाजारपेठा सजल्या, साड्यांचे विविध पर्याय

दिवाळी सणानिमित्त हिंगोलीसह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगावसह ग्रामीण भागातील बाजारपेठा सजल्या आहेत. या सणात कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्या अनुषंगाने कापड व्यापाऱ्यांनी स्टॉक मागवून ठेवला आहे. साध्या साडीवर हेवी वर्कचा डिझायनर ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड तरुणींमध्ये लोकप्रिय होत असून, आरी वर्कच्या ब्लाऊजसाठी महिनाभरापासून बुकिंग सुरू झाले आहे.

साड्यांचे विविध प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या बजेटनुसार ५०० रुपयांपासून ते २० हजार रुपयांपर्यंत साड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. यंदा टिश्यू, बांबू सिल्क, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क आणि रंगोली सिल्क या फॅब्रिक्सच्या साड्यांनाही महिलांकडून पसंती मिळत आहे. दिवाळीपूर्वी साड्यांच्या खरेदीला सुरुवात झाली असून, आवडीच्या साड्यांची निवड करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, महावीरस्तंभ भागातील कपडा विक्रीच्या दुकानात गर्दी पहायला मिळत आहे.

साडी साधी, ब्लाऊज मात्र डिझायनर

साडीच्या निवडीसोबतच तिच्यावर शोभून दिसणाऱ्या डिझायनर ब्लाऊजकडेही तरुणींचे विशेष लक्ष आहे. साध्या साडीला आकर्षक लूक देण्यासाठी हेवी वर्कचे ब्लाऊज शिवण्याचा ट्रेंड वाढत आहे. आरी वर्क, हेवी वर्क आणि वेगवेगळ्या डिझाइनमधील ब्लाऊजना मोठी मागणी आहे. यासाठी महिलांकडून महिन्यापूर्वीपासूनच ऑर्डर दिल्या जात आहेत. काही डिझायनर्सकडे ऑर्डर्सची संख्या वाढल्याने नवीन ऑर्डर घेणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीत साड्यांसोबतच डिझायनर ब्लाऊजचीही चर्चा रंगत आहे.

तरुण वर्गाची रेडिमेड कपड्यांना विशेष पसंती आहे. वाढती मागणी लक्षात घेता विक्रेत्यांनी विविध फॅशनेबल जीन्स, टी-शर्ट, शर्ट विक्रीसाठी आणले आहेत. सुरत, अमरावती, मुंबई आदी ठिकाणाहून रेडिमेड कपड्यांचा स्टॉक मागविण्यात आला आहे.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance