अंबरनाथ पश्चिमेतील उल्हासनगर-अंबरनाथ मार्गावरील टाइम स्क्वेअर परिसरात उभ्या असलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी सहा लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या ऐवजात अडीच लाख रुपयांची रोकड आणि पाच महागड्या मोबाईलचा समावेश आहे.
जेवणासाठी गेले असता चोरी
१ नोव्हेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास एका व्यावसायिकाने आपली कार अंबरनाथ पश्चिमेतील डी-मार्टजवळील रागा कॉम्प्लेक्स येथील एका चहाच्या दुकानासमोर उभी केली होती. कारमधील करड्या रंगाच्या पिशवीत अडीच लाख रुपये आणि पाच मोबाईल ठेवून ते पत्नी व मुलांसह जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून रात्री साडेबाराच्या सुमारास ते कारजवळ परतले असता, मागील उजव्या दरवाजाची काच फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. रोकड आणि मोबाईल असलेली पिशवीही गायब झाली होती.
पोलिसांत तक्रार, तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात धाव घेत चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक पुढील तपास करीत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply