धाराशिव जिल्ह्यात गोठ्यात बांधलेली जनावरे चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उमरगा आणि येरमाळा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण दोन लाख ४५ हजार रुपये किमतीचे पशुधन चोरून नेले. दोन्ही प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
जहागीर आष्टा येथे तीन म्हशी व एक वगार चोरीला
उमरगा तालुक्यातील जहागीर आष्टा येथे नागेराव राम जाधव (वय ५५) यांच्या शेतातील गट क्रमांक ९९/अ मधील गोठ्यातून रविवारी पहाटे चोरट्यांनी तीन म्हशी आणि एक वगार चोरून नेली. या जनावरांची किंमत एक लाख ३० हजार रुपये असून, या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पानगाव येथे म्हैस व दोन रेडी लंपास
दुसरी घटना कळंब तालुक्यातील पानगाव येथे घडली. गणेश विश्वनाथ बेडके (वय ४१) यांच्या शेतातील गट क्रमांक ३०/अ मधील गोठ्यात बांधलेली एक म्हैस आणि दोन रेडी चोरट्यांनी लंपास केल्या. या जनावरांची किंमत एक लाख १५ हजार रुपये असून, येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दोन्ही घटनांमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply