सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धर्मविजय यात्रेनिमित्त पंचवटीच्या शंकराचार्य मठात महाभिषेक

पंचवटीच्या शृंगेरी मठात रविवारी जगद्गुरू विधुशेखर भारती यांच्या हस्ते शारदांबा मूर्तीचा महाभिषेक झाला. देशभरातून आलेल्या शिष्य-भक्तांनी सोहळ्यात सहभाग घेतला.

धर्मविजय यात्रेनिमित्त पंचवटीच्या शंकराचार्य मठात महाभिषेक

पंचवटीतील शृंगेरी शंकराचार्य मठात रविवारी (१ नोव्हेंबर) अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांच्याहस्ते भगवती श्री शारदांबा तसेच जगद्गुरू शंकराचार्यांच्या मूर्तींच्या गर्भगृहात महाभिषेक व विविध वैदिक धार्मिक अनुष्ठान सोहळा उत्साहात पार पडला. शृंगेरी श्री शारदा पीठाच्या अखंड वैदिक व आध्यात्मिक परंपरेचा गौरव अधोरेखित करणारा हा सोहळा पंचवटीच्या धार्मिक इतिहासातील एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी पर्व ठरला.

धर्मविजय यात्रेनिमित्त भेट

कुंभमेळा ध्वजारोहणासाठी धर्मविजय यात्रेनिमित्त जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामी शहरात आले असता त्यांनी शृंगेरी शंकराचार्य मठाला भेट दिली. या वेळी विशेष धार्मिक विधी पार पडले. २००७ मध्ये याच ठिकाणी जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते भगवती श्री शारदांबा तसेच जगद्गुरू शंकराचार्यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

सुमारे १७०० पासून अस्तित्वात असलेली शाखा

शृंगेरी श्री शारदा पीठाची पंचवटीतील ही शाखा सुमारे १७०० पासून अस्तित्वात आहे. या ठिकाणी शृंगेरीच्या अखंड गुरु-शिष्य परंपरेतील २८ वे आणि २९ वे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या महासमाधी असल्याने या स्थानाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे, असे मठाचे व्यवस्थापक राम गोपाल अय्यर यांनी सांगितले. देशभरातून आलेल्या शिष्य-भक्तांनी धार्मिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी मठाचे व्यवस्थापक रामगोपाल अय्यर यांच्यासह शंकर अय्यर, सुंदर अय्यर, शेखर मामा, गणेश अय्यर, व्यंकटरमणी अय्यर, बलराम अय्यर यांनी परिश्रम घेतले.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance