सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यासाठी महामहिम राष्ट्रपती महोदया व मा. मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, नागरिक आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे. त्यानुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील क्षेत्रात ड्रोन उड्डाण व पॅराग्लायडिंग करण्यास ३० व ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय ड्रोन उड्डाण व पॅराग्लायडिंग करता येणार नाही. नाशिक ग्रामीण जिल्हा ‘नो ड्रोन’ व ‘पॅराग्लायडिंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी आदेशात नमूद केले आहे.
Leave a Reply