सलग दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती. मात्र बुधवारी, २८ ऑक्टोबरला सोन्याच्या भावात १,२०० रुपये, तर चांदीच्या भावात १,००० रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे सोने-चांदीच्या भावात चढउतार होत आहे. दसऱ्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात घसरण होत होती आणि चांदीचे भाव दोन लाख रुपयांच्या खाली आले होते.
आजचे भाव
मंगळवारी सोने एक लाख ४१ हजार ८०० रुपये प्रतिदहा ग्रॅम (विनाजीएसटी) होते. त्यात बुधवारी १,२०० रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख ४३ हजार रुपयांवर आले आहे. चांदीच्या भावातही १,००० रुपयांची वाढ झाली असून मंगळवारी एक लाख ९७ हजार रुपये प्रतिकिलो (विनाजीएसटी) असलेले चांदीचे भाव बुधवारी एक लाख ९८ हजार रुपयांवर आले आहेत.
गेल्या काही दिवसांतील भाव
२४ ऑक्टोबरला सोने १ लाख ४१ हजार ५०० रुपये प्रतिदहा ग्रॅम आणि चांदी २ लाख २ हजार रुपये प्रतिकिलो होती. २५ ऑक्टोबरला हेच भाव कायम होते. २६ ऑक्टोबरला सोने १ लाख ४२ हजार रुपये आणि चांदी १ लाख ९९ हजार रुपये झाली. २७ ऑक्टोबरला सोने १ लाख ४१ हजार ८०० रुपये आणि चांदी १ लाख ९७ हजार रुपये होती, तर २८ ऑक्टोबरला सोने १ लाख ४३ हजार रुपये आणि चांदी १ लाख ९८ हजार रुपयांवर पोहोचली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply