त्रापेस शहरात कारमधून अंदाधुंद गोळीबार
फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या पश्चिमेकडील यवेलाइन जिह्यातील त्रापेस शहरात शुक्रवारी गोळीबाराची गंभीर घटना घडली. एका व्यक्तीने आपल्या कारमधून अंदाधुंद गोळीबार केल्याने परिसरात घबराट पसरली. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून किमान चार जण जखमी झाले आहेत.
मुलगीही जखमी, संशयिताला अटक
जखमींमध्ये 12 वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. घटनेनंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आणि संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली. घटनेचा तपास सुरू असून पोलिस हल्ल्यामागचे कारण शोधत आहेत.
आणखी वाचा ·डायल ११२ चा गैरवापर करणाऱ्या दोघांवर कारवाई
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply