प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पूर्णेकर यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.
मानपाडा परिसरात रात्रभर आंदोलन
पूर्णेकर यांच्या समर्थकांनी ठाण्यातील मानपाडा परिसरातील मानपाडा उड्डाणपुलाखाली मंगळवारी रात्रभर रास्तारोको आंदोलन केले. पहाटेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे मानपाडा परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांवर दगडफेक
आंदोलनादरम्यान समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी समर्थकांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले होते. हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकारण तापले असून प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply