वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराचा संबंध घरातील सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. स्वयंपाकघरातील ओटा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा, असे मानले जाते. ओट्यावर ठेवलेल्या वस्तूंचा संबंध आर्थिक स्थिती आणि समृद्धीशी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काही वस्तू ओट्यावर ठेवणे टाळावे, असा सल्ला दिला जातो.
ओट्यावर ठेवू नयेत अशा गोष्टी
तुटलेली भांडी: तुटलेली किंवा तडकलेली भांडी ठेवणे अशुभ मानले जाते. ती कमतरता आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानली जातात. वापरण्यायोग्य नसलेली भांडी साठवून ठेवण्याऐवजी टाकून द्यावीत, असे सांगितले जाते.
औषधे: अनेक जण औषधे गॅसजवळ ठेवतात. वास्तूनुसार स्वयंपाकाची जागा औषधांपासून वेगळी ठेवणे उत्तम मानले जाते. व्यावहारिकदृष्ट्याही औषधे उष्णतेच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून ती स्वयंपाकघरात ठेवणे टाळावे.
रिकामे डबे: पिठाचे, तांदळाचे, डाळींचे आणि मसाल्यांचे रिकामे डबे ओट्यावर जास्त वेळ ठेवणे टाळावे. धान्य हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे रिकामे डबे काढून ओटा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे उत्तम.
ओट्यासमोर आरसा: स्वयंपाकघर अग्नी तत्त्वाशी संबंधित मानले जाते. चुलीसमोर आरसा ठेवल्याने ज्योतीचे प्रतिबिंब दिसते, जे उचित मानले जात नाही. यामुळे अग्नी तत्त्वाचे असंतुलन होते आणि अनावश्यक खर्च होतो, असे मानले जाते.
स्वच्छतेचे साहित्य: स्वच्छतेचे कापड, ब्रश आणि इतर साधने वापरानंतर ओट्यावर ठेवणे टाळावे. यामुळे स्वयंपाकघरात पसारा होऊ शकतो आणि स्वयंपाक करण्याच्या जागेवर परिणाम होऊ शकतो.
शिळे अन्न किंवा मुदत संपलेले मसाले: खराब झालेले किंवा जुने पदार्थ स्वयंपाकघरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, असे मानले जाते. त्यामुळे अशा वस्तू वेळीच काढून टाकाव्यात.
ओट्यावर सांडलेले तेल, अन्नपदार्थ किंवा पाणी त्वरित स्वच्छ करावे. स्वच्छ आणि व्यवस्थित स्वयंपाकघर हे सकारात्मक वातावरणाशी जोडलेले असते, असे वास्तुशास्त्र सांगते.
टीप: धर्म, ज्योतिष, वास्तु यांसारख्या विषयांवरील माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply