जळगाव येथे जिल्हा माहेश्वरी सभा आणि श्री जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समिती यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा सुप्रीम इंडस्ट्रीजचे संचालक महावीरप्रसाद तापडिया यांचा आत्मीय सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी समितीचे अध्यक्ष मनीष झवर, सचिव डॉ. जगदीश लढ्ढा, संजय दहाड आणि प्रदीप मणियार उपस्थित होते. जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष तेजस देपुरा, जिल्हा सचिव अरुण लाहोटी, कार्याध्यक्ष वासुदेव बेहेडे, संघटन मंत्री सुनील मानुधने व विजय झवर, कोषाध्यक्ष सुनील बाहेती, उपाध्यक्ष अरविंद दहाड व योगेश कलंत्री, संयुक्त मंत्री विलास काबरा तसेच विलास करवा आणि डॉ. विश्वनाथ सोमाणी या वेळी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply