आम आदमी पक्षाच्या महागाई मुक्ती यात्रेचा चौथा दिवस कुडतरीत पार पडला. या दिवशी पक्षाच्या नेत्यांनी घरोघरी भेटी देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला.
घरोघरी भेटी, महागाईचा मुद्दा
पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, उपाध्यक्ष रोके मस्कारन्हास आणि अन्य पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य कुटुंबांवर पडणाऱ्या आर्थिक भाराचा मुद्दा नेत्यांनी उपस्थित केला. वाढत्या महागाईमुळे कुटुंबांचे आर्थिक नियोजन बिघडत असून त्यांच्या दैनंदिन अडचणींकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला.
दरमहा 15 हजार रुपयांच्या लाभाचे आश्वासन
या मोहिमेदरम्यान पक्षनेत्यांनी नागरिकांना ‘आप’च्या हमी योजनांची माहिती दिली. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजार रुपयांचा थेट आर्थिक लाभ मिळवून देण्याचा पक्षाचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. महागाईच्या प्रश्नावर नागरिकांशी थेट संवाद साधणे आणि पक्षाच्या आर्थिक हमींबाबत माहिती पोहोचवणे, हाच या यात्रेचा उद्देश असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा