टोयोटा किर्लोस्कर मोटरने जपानमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त पर्कशन समूह ड्रम ताओ यांच्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. ड्रम ताओ हे टोयोटा किर्लोस्कर मोटरचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. गेल्या वर्षी १३ शहरांमध्ये झालेल्या दौऱ्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा हा समूह देशाच्या चारही विभागांतील २१ शहरांमध्ये सादरीकरण करणार आहे.
पारंपरिक जपानी वा-डाइको ढोलवादन आणि आधुनिक रंगमंचीय सादरीकरण यांचा अनोखा संगम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे. टियर-२ शहरांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
दोन टप्प्यांत दौरा; हॉर्नबिल महोत्सवात सुरुवात
हा दौरा दोन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पहिला टप्पा १ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२६ आणि दुसरा टप्पा ८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होईल. दौऱ्याची सुरुवात नागालँड येथील हॉर्नबिल महोत्सवात होईल. यामध्ये लखनौ येथील रेपर्टवाहर कल्चरल फेस्टिव्हल तसेच पोर्ट ब्लेअर येथील आयलंड म्युझिक फेस्टिव्हल यांसारख्या संगीत आणि सांस्कृतिक महोत्सवांमधील सादरीकरणांचा समावेश असेल. त्यानंतर हा दौरा चंदीगड येथे संपन्न होईल.
वेळापत्रक अधिकृत माध्यमांवर उपलब्ध होणार
दौऱ्याचे वेळापत्रक आणि आयोजन स्थळांची सविस्तर माहिती टोयोटाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया चॅनेल्सवर अद्ययावत केली जाईल. गेल्या वर्षीच्या दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे यंदा अधिक शहरांपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मिळाली आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा