राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार पार्थ पवार यांच्या एका स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर ‘तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या, पण साप हा सापच असतो’ असा मजकूर शेअर केला आहे. त्याच आशयाची इन्स्टाग्राम स्टोरीही त्यांनी लावली आहे. या पोस्टनंतर त्यांच्या स्टेटसमधून नेमका कोणाला टोला लगावण्यात आला, याची मोठी चर्चा रंगू लागली आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
पार्थ पवार यांनी शेअर केलेल्या स्टेटसमध्ये ‘तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या, पण साप हा सापच असतो’ अशा शब्दांत संदेश दिला आहे. हीच ओळ त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरी म्हणूनही शेअर केली आहे. या ओळींमधून डसणारा साप म्हणून नेमका कोणाचा उल्लेख केला, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
नाव न घेता इशारा कुणाकडे?
पार्थ पवार यांनी या पोस्टमधून कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या स्टेटसमागील नेमका संदर्भ काय, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे आणि ‘साप’ नेमका कोण, त्यांनी कोणाला उद्देशून हा टोला लगावला आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नाव न घेता दिलेल्या या इशाऱ्यामुळे चर्चांना आणखी रंग चढला असून यावर पुढे काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा