डिलिमिटेशन विधेयकावरून देशभरासह राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या विधेयकाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपल्या फुटीर खासदारांना व्हिप जारी केला आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या काही तास आधीच टाकलेल्या या डावामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सहा खासदारांच्या घराबाहेर व्हिपचे पत्र
ठाकरे गटाने एकूण नऊ खासदारांना व्हिप जारी केला आहे. त्यामध्ये फुटीर खासदारांचाही समावेश आहे. फुटीर खासदारांच्या घराबाहेर थेट व्हिपचे पत्र लावण्यात आले आहे. दरवाजाच्या बाजूला सहज दिसेल अशा ठिकाणी हे पत्र लावण्यात आले. ठाकरे गटाच्या या कृतीमुळे सहा फुटीर खासदारांची कोंडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याच्या सूचना
उद्धव ठाकरे यांनी डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे, अशा सूचना फुटीर खासदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फुटीर खासदार ठाकरे गटाच्या व्हिपचे पालन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने संसदेत मतदान केले तर ते परिच्छेद २(१)ब नुसार अपात्र ठरतील, असा दावा वकील असीम सरोदे यांनी केला आहे. या दाव्यानंतर फुटीर खासदारांचे टेन्शन वाढले आहे. अधिवेशनात ठाकरे गटाचे फुटीर खासदार नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा