पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्वचेवरची चमक टिकवणं सोपं नसतं. पण बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनच्या बाबतीत हे सहज घडताना दिसतं. वयाच्या ५४ व्या वर्षीही तिच्या चेहऱ्यावर तरुणाईला लाजवेल असा ग्लो दिसतो. तिच्या या तेजामागचं रहस्य काय, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडतो. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं स्वतः याबद्दल सांगितलं आहे.
तिच्या मते व्यायामासोबतच आहाराचीही मोठी भूमिका आहे. ती सकाळी उठल्याबरोबर हळदीचं पाणी पिते. हे पाणी तयार करण्यासाठी ती स्वतःच्या शेतात पिकवलेल्या सेंद्रिय हळदीचा वापर करते. हळदीचं पाणी प्यायल्यानंतर ती नेहमीचा नाश्ता करते. ही सवय तिच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनली आहे.
हळदीचं पाणी पिण्याचे फायदे कोणते?
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा दाहशामक घटक असतो. तो शरीरातील सूज नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करतो. सांध्यांच्या आरोग्यासाठीही हळद फायदेशीर मानली जाते. हळदीचं पाणी रोज प्यायल्याने शरीराला आतून बळ मिळतं, असं सांगितलं जातं.
रोगप्रतिकारशक्तीच्या बाबतीतही हळदीचं पाणी उपयुक्त ठरू शकतं. डॉक्टरांच्या मते हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असतात. रोजच्या आहारात हळदीच्या पाण्याचा समावेश केल्यास शरीराला आजार आणि संसर्गापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. पचनाशी संबंधित त्रास, अपचन, पोटात जडपणा, गॅस आणि आम्लपित्त यामध्येही हळदीचं पाणी फायदेशीर ठरू शकतं.
चाहत्यांमध्ये उत्सुकता का?
अभिनेत्रीच्या आहाराबद्दल आणि फिटनेस दिनचर्येबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. महागड्या उपचारांऐवजी घरातली साधी सवय त्वचेच्या तेजासाठी उपयोगी ठरू शकते, हे या उदाहरणातून दिसतं. सकाळी एक ग्लास हळदीचं पाणी पिण्याची सवय आरोग्यात लक्षणीय बदल घडवू शकते, असं या संदर्भात सांगितलं जातं.
रविनाच्या या साध्या सवयीची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली आहे. तिच्या सौंदर्याचं आणि तंदुरुस्तीचं रहस्य नेमकं याच छोट्याशा दिनचर्येत दडलं असल्याचं तिनं मुलाखतीत सांगितलं.
प्रतिक्रिया व्यक्त करा