डिलिमिटेशननंतर लोकसभेतील खासदारांची संख्या ५४३ वरून ८१६ होण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ८१६ जागांचा संभाव्य नकाशा सादर केला आहे. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे ५० टक्के जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेतील जागा ५४३ वरून थेट ८१६ वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात किती वाढ?
या संभाव्य नकाशानुसार उत्तर प्रदेशातील जागा ८० वरून १२० होण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातील जागा ४८ वरून ७२ होण्याचा अंदाज आहे. इतर राज्यांमध्येही याच प्रमाणात जागा वाढण्याची शक्यता आहे.
विरोध आणि पाठिंब्याचे राजकारण
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या विधेयकाला इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी विरोध केला आहे. तर शरद पवार आणि एम के स्टॅलिन यांचा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीकडून या दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या विधेयकावरून राजकीय वातावरण तापलेले असताना पुढील काळात यावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा